" साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव..........."!!!

     सासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन  श्री  . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे  … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली "आळंदी " येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाण्याचे भाग्य  लाभले भाग्यच म्हणावे लागेल   .... कारण त्या नंतर झालेल्या प्रत्येक साहित्य समेलन म्हणजे साहित्य संमेलनचा खर्च , अनुदान  आणि त्यांचे राजकारण हेच गाजत  असते    …!!  या पार्श्वभूमीवर मी अनुभवलेले हे साहित्य समेलनाचे महत्व साहित्य पंढरी म्हणजे काय हे  अधिक अधोरेखित करणारे आहे …! या साहित्य पंढरीची मला एक साहित्याची वारकरी होण्याचे भाग्य लाभले  ... त्या साहित्य समेलनातील काही मनोहारी , काही रंजक, विनोदी काही विचार करायला लावणा-या अश्या अनुभवांचा आनंद माझ्या मित्र मैत्रिणींना देण्यासाठी हा प्रपंच   …!  आशा आहे तुम्हाला वाचून आनंद मिळेल   ....!!!
                                      

     १ फेब्रुवारी  ११९६ रोजी आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आळंदीत जोरदार तयारी सुरु होती   …! संमेलनासाठी येणा-या साहित्य प्रेमींच्या स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज झाली होती  …!! कवियत्री "शांता शेळके " अध्यक्ष असणा-या व "लता मंगेशकर " उद्घाटक असणारे हे  संमेलन "इंद्रायणीच्या " तीरावर १५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या "अलंकापुरित " चार दिवस होणार होते  . मुख्य मंडपास "संत dnyaandev  मंडप " तर कविसंमेलन मंडपास संत मुक्ताई मंडप नाव देण्यात आले होते ! ग्रंथ प्रदर्शनासाठी २५० स्टॉल उभारण्यात आले होते … ! मुख्य मंडपात एकावेळी ३० ते ३५ हजार रसीक बसु शकतील अशी व्यवस्था होती  मंडपात क्लोज सर्किट टीव्ही बसवण्यात आले होते   ....! अश्या या साहित्य संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, कीर्तनादि कार्यक्रमांची आमच्या सारख्या रसिकांसाठी पर्वणीच होती  .  

     अश्या या अलंकापुरीला मी माझ्या मैत्रिणीनी ३१ जानेवारीला  ला प्रयाण केले   …! या साहित्य पंढरीला जाण्यापूर्वी मी माझ्या गुरु , शिक्षिका यांची  भेट घेऊन  आशीर्वाद मार्गदर्शन घेतले…! माझ्या साठी हा अत्यंत भाग्याचा  दिवस होता   …! मी प्रथमच साहित्यातील माझ्या  देवांना प्रत्यक्ष पाहणार होते , ऐकणार होते  . 

    पुणे म्हणजे साहित्याचे (विशेषत: मराठीचे) साहित्यिकांचे माहेरघर  . अश्या या साहित्याच्या माहेरघरी  अगदी प्रथमच जाण्याची संधी या संमेलनाच्या निमित्ताने मिळाली   . साहित्य संमेलन १ फेब्रु , १९९६ ते ३ फेेेेब्रु पर्यंत होते   . आम्ही मैत्रिणीनी ३१ जानेवारीला पुण्याला  वस्ती केली , त्यापूर्वी प्रथम आळंदीला  जाऊन  रहाण्या-खाण्याची सोय  करून  आणि साहित्य संमेलन प्रतिनिधि म्हणून प्रवेशपत्र  मिळवून पुण्याला संध्याकाळी ७.३०  ला पोहचलो  …!

      पुण्याच्या वास्तव्यात आणि प्रवासात पुणेरी माणसांच्या अनेक वैशिष्टयांपैकी माझ्या निदर्शनास , अनुभवास आलेली काही वैशिष्ट्य अशी   …(इथे माझ्या पुणेकर मित्र-मैत्रिणींच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतु नाही   . दुखावल्यास क्षमस्व) )

       समुद्रात राहून /पाहुन ओलं न होता बाहर पड़ता येईल  …? कोरडे रहाता येईल  …? साहित्याच्या माहेरघरी आश्याही व्यक्ति भेटल्या ज्यांना साहित्य - साहित्यिक  याबाबत अजिबात उत्सुकता किंवा कुतूहल जाणवले नाही  .! या व्यक्ति म्हणजे (ज्यांच्या पुण्याच्या घरी आम्ही राहिलो होतो ते  माझ्या मैत्रिणीचे मामा  जे पुण्याच्या "न्यू इंग्लिश स्कूल" मध्ये सायन्स टीचर आहेत आणि तिचे दोन मामे भाऊ आनंद-मकरंद   .  या तिघानाही आम्ही मुंबईहून (पुण्याच्या वक्रदृष्टीने) ख़ास आळंदी च्या साहित्यसंमेलना साठी आलो आहोत हे पाहूनच गंमत    ....  वाटली !  त्यांच्या मते साहित्यिक गोष्टी म्हणजे सगळा काल्पनिक खेळ ! सायन्स वाल्यांना पूर्ण सिद्धांतिक वास्तव आवडते  . असा विचार जरी  करीत असले तरी तो त्यांचा किंवा त्यांच्या वैचारिकतेचा दोष नाही तर एकूणच विचार प्रवृतितिल एक कमतरता आहे एवढेच म्हणू शकते  . 

     पुण्याची माणसं ताटात किंवा ताटातील एकहि शीत खाली न पडू  देण्याची जितकी काळजी घेतात तितकीच काळजी ते समोरील व्यक्तीचा एकही  शब्द खाली न पडण्याची घेतात  .  थोडक्यात हाताला हात न भीड़वता अक्षराला अक्षर भिडवून अहिंसात्मक वादामारी करतात   …!!  'आम्ही शिवाजीनगर -(कॉर्पोरेशन) येथून आळंदी बस मध्ये चढलो  .  आमच्या जवळ खुप सामान , त्यामुळे सर्वांच्या आधी बसमध्ये सीट मिळवण्या साठी पळत  सुटलो   …पण सर्वांच्या शेवटी बस पर्यन्त पोहचलो  …! अर्थात बसमध्ये  सर्वात शेवटची सीट मिळाली   .!! 
    आमच्या अगदी  पुढच्याच सीटवर दोन  मांजरीं मध्ये उंदराने बसावे (पु   . ल  . चे  वाक्य  ) त्याप्रमाणे दोन अवजड स्त्रियांच्या मध्ये एक पुरुष बसला होता  .!    काही अंतराने कुठलेतरी बस स्थानक आले खिड़की जवळची स्त्री उतरली तीच संधि साधुन तो मधला पुरुष खिड़कीजवळ सटकला .... ! परंतु  …। त्यांच्याच सीटजवळ तितकीच वजनमापाची स्त्री सीटच्या आशेने उभी होती  … ती बसलेल्या स्त्रीला सरकायला सांगत होती  .... पण बसलेली स्त्री ढिम्म   ....!! " अहो बाई ! जरा सरकायताय का   …?  उभी स्त्री  .  "नाही बाई ! मला नाही सरकायचं   " बसलेली स्त्री  .  (मुंबईच्या लोकल डब्यात एखादी बाई सीट वरुन उठली कि शेजारचीचा सरकने हा हक्कच असतो, त्यासाठी भांडण, मारामा-या होतात ! इथ सगळे  वेगळे होते )  "मग मला आत तरी जाउ दया   .... " उभी स्त्री   . "मग जा की  .... " बसलेली स्त्री  .  त्या तेव्हढ़याश्या अरुंद जागेतुन  ते रुंद शरीर महत्प्रयासाने ओढत , ताणत  ती उभी स्त्री बसण्याचा प्रयत्न करीत असतानाच  … बसलेल्या स्त्रीच्या मांडीवर बसली ! (नशीब त्या  खिड़कीतल्या माणसाचे) अहो बाई ! रिकामी जागा दिसत नाही का  …? "दिस्तीय म्हणून तर  बस्तिय , तुम्ही सरकत नाही , रिकाम्या जागेवर बसु देत  नाही ! मग करायच काय  …? (शेजारचा मनुष्य भेदरून खिड़कीच्या कनपटीत  अधिकच घुसत होता  …!  हातातलं  सामान कसंतरी सीट खाली चेपित ती  स्त्री बसली पण तोंडाचा पट्टा चालूच  … "रिकाम्या जागेत बसावं  तरी मेलं यांची शिरजोरी ! एक  ना  दोन  .  या संपूर्ण प्रसंगात कुठे तरी वाद घालायला कारणीभूत ठरलेले एकतरी सयुक्तिक कारण "बसतं " का ?

      कुठल्याही प्रश्नाचे (अगदी तो प्रश्न सरळ साधा असला तरी) पुणेकरी माणूस त्याचे उत्तर सरळ  देईल याची काही खात्री नसते   .! आळंदीला आम्ही प्रथमच जात होतो आमच्या ओळखीच्या बांईनी आम्हाला दिलेला पत्ता शोधण्यास आम्ही बसमधूनच प्रारंभ केला आमच्या जवळच एक आळंदीकर वयस्कर गृहस्थ बसले होते   … त्यांच्या पासूनच सुरुवात केली   .   "काहो   … इथे आळंदीला मराठा धर्मशाळा कुठे आली" मी  . .... …? अहो  ! इथं ब-याच धर्मशाळा आहेत  . घर न्हाई एकवेळ सापडणार पण धर्मशाळा जागोजागी पेरल्यात ) ( आम्ही विशिष्ट नावासकट प्रश्न विचारला होता पण उत्तर सरळ नाहीच   …! "बरं पाण्याची टाकी कुठे आली  ? " आम्ही  . "आता तुम्हाला नेमकी कुठची टाकी पायजेल  ?" म्हणजे आगरी धर्मशालेजवळची की खालच्या मुंबईच्या जेवण डब्यावाल्यांच्या धर्म शालेजवळची  …?" (मघाशी विशिष्ट नावासह  धर्मशाळेचं नाव विचारले तरी उत्तर नाहीच  …! अश्या या पुणेरी वल्ली  .... !! पण  काहीही असो   चुकणा-याला शाल जोडितला मारुन कान पिळून शिकवणी घेण्याची जी रीत असते ती  वाखणलिच पाहिजे…! ही एक पुणेरी पाटी पहा  ....... !

                                               

    एकदाचे आम्ही आमच्या धर्मशाळेच्या मुक्कामी पोहचलो "मराठा धर्मशाळा " तिचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असलेली एक इमारत होती  . त्यातील एका खोलीत आमची रहायची व्यवस्था झाली  . आधीच पुणे ते आळंदी  प्रवास करून थकल्या भागलेल्या आम्ही आल्या आल्या जमिनीवर बैठक ठोकल्या   . पोटात भुकेचे कावळे आक्रोश करीत होते   .  शेवटी खोलीच्या मागच्या बाजूलाच पाण्याचे एकमेव नळ होता  . ( तिथे २४ तास पाणी होते  …! ) त्यावर हातपाय धुवून आम्ही पुण्याहून आणलेल्या नाष्ट्यावर  अक्षरशा तुटून पडलो  .   ताजेतवाने वाटू  लागले  आणि आम्ही इंद्रायणी तीरावर १५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या "अलंकापुरीकडे" प्रस्थान केले ! त्या रम्य संध्याकाळी रस्त्याने जाताना आमच्यात  अगदी एक वेगळेच चैतन्य संचारले होते  .   आम्ही त्या साहित्य नगरीतील "अलंकापुरीमध्ये उत्साहानेच  प्रवेश केला प्रवेश बैच लावून आम्ही प्रथम सारी  अलंकापुरी फिरुन  येण्याचे ठरविले  .

     प्रवेशद्वारावरच अनेक दिग्गज साहित्यकांचे तैलचित्र गुंफून जणू तोरण लावले होते  .  आम्ही मुख्य मंडपात आलो  … जिथे गानसम्रादनी " गानकोकिळा " लता मंगेशकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार होते  . त्यास "संत dnyaandev मंडप "  नाव देण्यात आले होते  . तर कवी-कवितांच्या सोहळ्या साठी उभारण्यात आलेल्या मंडपास "संत मुक्ताई" नाव दिले  होते  .  आम्ही सार्वजणी मंत्रमुग्ध होऊन साहित्य नगरी फिरत असतानाच टाळ -मृदंगाचा आणि लेझिमचा आवाज कानी आला  .  प्रवेशद्वाराजवळ ग्रंथदिंडीने प्रवेश केला होता   .!  या दिंडित सहभागी होण्यासाठी नेवाश्याहुन  dnyaaneswharinchi , देहू तून तुकारामांच्या गाथेचि व सज्जनगडावरून दासबोधांच्या गाथेचि पालखी आणण्या  आली होती  . ! प्रत्यक्ष साहित्य समेलनापूर्वीची ही पूर्व संध्या म्हणजे उद्याच्या साहित्य पंढरीमधील साहित्य भाव भक्तीचा मेळा कसा रंगणार होता त्याची नांदी होती  … ! रात्र झाली होती  । आमच्या मुक्कामी आम्हाला जायची इच्छा नसतांना   … आम्हाला या भारलेल्या वतावरणातून जावे लागत होते  .! दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे कधि पळाला आम्हाला कळलेच नाही  …! दुस-या दिवशी पहाटेच उठायचे होते   …! सकाळी ७ वाजता या अलंकापुरित परत यायचे आहे या आनंदातच आम्ही आमच्या मुक्कामी पोहचलो  …!

      पहाटे पाचला  आम्ही सा-या उठून साडे सहां पर्यंत तयार होऊन सकाळच्या त्या रम्य गुलाबी थंडीत चालतच "अलंकपुरीकडे " निघालो  … ! अर्थात प्रथम dnyaaneshwaranchyaa  समाधीचे दर्शन घेतले  … ! खुप पवित्र पवित्र वाटत होते  .! आणि ज्या सोहळ्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो देखणा सोहळा आम्ही याची देहि याची डोळा पहिला   …!!  साहित्य समेलनाच्या उद्घाटनाचा ५५० बाय ३०० फुट आकाराच्या "संत dnyaandev मंडप  या मुख्य मंडपात समोरील फुलानी सजवलेल्या व्यासपीठावर भव्य-दिव्य व्यक्तिमत्व बसली होती   .! त्यामध्ये संमेलनाच्या अध्यक्षा श्रीम  . शांताबाई शेळके , गानसम्रादनी श्रीम  . लताबाई मंगेशकर ,   मावळते साहित्य संमेलन अध्यक्ष श्री  . विद्याधर गोखले आदी मंडळींना मी तर  अगदी  विलक्षण नजरने अगदी भारावल्या सारखी बघत होते  .  आमच्या सारख्या साहित्य वेड्या रसिकांसाठी  ती आमची दैवत .......!!!!                          

                                    


     आतापर्यंत लतादीदींना गाताना एकले /पाहिले होते पण त्यावेळी प्रथमच काहीतरी वेगळं एकायला आणि पहायला मिळाले   .  त्यांचे भाषण म्हणजे "पसायदान" वाटले  .  लयबद्ध , शब्दप्रधान , सुरताल  आपोआप गुंफीत  जाते ती कविता   .... असा काव्यात्मकतेचा अनुभव प्रत्यक्ष पहायला  … ऐकायला  मिळाला  .  त्यानंतर साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीम शांता शेळके यांचे भाषण म्हणजे ओजस्वी वाणी  आणि तेजस्वी भाषाशैलीचा दुग्धशर्करा योग होता  .  या सर्व भारावलेल्या मनस्थितीतच आम्ही दुपारनंतर धर्मशाळेत आलो  .  थोड़ी विश्रांती घेऊन संध्याकाळच्या ख़ास कार्यक्रमासाठी आम्ही उत्सुक होतो   .... संध्याकाळी तयारी करुन  आम्ही इंद्रायणी तिरावरून साहित्यनगरीकडे निघालो होतो   …… ! मी कुतूहलाने इंद्रायणीला बघून घेतले   .... कारणही तसेच ख़ास होते   .... !!

     साहित्यनगरीत आम्ही प्रथम गेलो ते पुस्तकपंढरीला भेट दयायला १० बाय १२ फुट आकाराचे सुमारे २५० पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते  .  तिथे प्रवेश  केला  ....  आणि मला अलिबाबाच्या गुहत शिरल्या सारखे भान हरवून आधाशा सारखी पुस्तकांच्या जत्रेत स्वत:ला झोकून दिले  .  अनेकविध पुस्तकांमध्ये मी एवढी हरवून गेले कि होते कि प्रतिभा आणि वीणा या माझ्या मैत्रिणी  माझ्यापासून कधी  दूर गेल्या मला कळलेच नाही  …!!! रात्रीचे जवळ जवळ आठ वाजले असतील पुस्तक खरेदी करुनही माझी त्या पुस्तक जत्रेतुन बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नव्हती   … तेव्हढयात पाठीमागुन प्रतिभा आणि वीणाने पाठीत जोरात धपाटे टेकले    ………  मी भानावर आल्यासारखी  त्यांच्याकडे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले  . त्या बिचा-या  दोघी मला शोधून शोधून दमल्या होत्या  शेवटी कंटाळून धर्मशाळेकड़े परतत असताना  अचानक त्यांना मी मंडपात सी सी टीव्ही  बसवण्यात आले होते त्यामध्ये मी या पुस्तकांच्या स्टॉलवर दिसले म्हणून बरे  ……!!


     मुख्य मंडपाच्या बाहेर आम्ही आलो  आणि अचानक मला इंद्रायणी  तिराची आठवण झाली   .... आणि जवळ जवळ ओरडतच इंद्रायणी तिराकडे धावत सुटले  .... कारण इंद्रयाणीकडे जायला आम्हाला आधीच खुप उशीर झाला होता  .... !! दँयानेश्वर  माऊलींनी नऊ हजार तेहतीस ऒव्यांनी ड्यानेश्वरीची रचना केली  . त्या अनुषंगाने संमेलनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त नंतर इंद्रायणी नदीत नऊ हजार तेहतीस dnyaandip सोडण्यात येणार होते  ……!!  आम्ही गर्दीतून वाट काढत तेथे पोहचलो  .... आणि समोरचे दृश्य बघून हरखून गेलो  .... !!

     रात्रीच्या अंधारात हजारो दीप मिनमिनत्या प्रकाशात पाण्यात हेलकावे घेतानाचे दृश्य अतिशय विलोभनीय दिसत होते  ....!! इंद्रायणीच्या काळ्याशार पाण्यावर  दीपकळ्या जणू उमलल्या होत्या।  त्याचे वर्णन शब्दातीत आहे   ……!!!
                                        

     दुस-या दिवशी आम्ही संत dnyaneshwar माऊली उत्तमेश्वर पिंपरीकर यांचे कीर्तन आयोजीत करण्यात आले होते  .   त्यावेळी १२ जण  एकाच वेळी पखवाजावर त्यांना साथ देत होते आणि सुमारे दोन हजार टाळकरी त्या तालावर कीर्तनात् रंग भरत होते  .  तो नाद्ब्रंम्हाचा एकत्रित गजर ऐकून अवघी आळंदी दुमदुमुन गेली   ....  आणि तो मुख्य मंडप अवघ्या पंढरीमध्ये रूपांतरित झाला   …!!

     दुस-या दिवशी आम्ही "dnyaneshware रचिला पाया " या परिसंवादाला हजेरी लावली  … तेथे  राम शेवाळकर , यु . म. पठाण , आणि शिवाजीराव भोसले   .... या दिग्गजांचे विचार आणि ते व्यक्त करण्याची शैली   आम्हाला बरेच काही देऊन गेली   ....!!!  तेथेच तेथेच आम्हाला श्री   . माधव गडकरी , शिरीष पै  आणि वीणा देव , सुधीर रसाळ भेटले अर्थात आम्ही आमच्या ऑटोग्राफ  डाय-या त्यांच्या पुढ्यात सरसावल्या   .... त्यांच्या  स्वाक्ष-या  अजूनही मी एखाद्या मोरपिसा सारख्या जपून ठेवल्या आहेत   .
                                                         
     मी माझ्या घरी संध्याकाळी फोन करत होते , त्याप्रमाणे रात्री फोन केला  .... काल फोनवर माझ्या बाबांनी मला अर्जंट घरी परत बोलविले होते  .... कारण मला  गव्हर्नमेंट नोकरीचा इंटरव्यू  कॉल आला होता  … मुलाखतीचा दिवस नेमका ४ फेब्रुवारी होता , म्हणजे मला  साहित्य संमेलनाचा शेवटचा तीस-या दिवसाचे कार्यक्रमांचा आनंद घेता येणार नव्हता  …!  मी बाबांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला  की  मी कंटाळले आहे इंटरव्यू देऊन  .... ,  मला  नाही यायचे  ....! मला वाटले बाबांचा आग्रह कमी झाला असेल  आणि मला उद्या परत जावे लागणार नाही  … ! पण  …  बाबांनी उद्या तू घरी परत ये असे फर्मानच सोडले   … मग माझाही नाइलाज झाला  .  उद्याचा साहित्य संमेलनाच्या शेवटचा दिवस  दुपार पर्यंतचे जमतील तेवढे सर्व कार्यक्रमाना हजेरी लावण्याचे मात्र ठरविले होते  …! त्याप्रमाणे नवोदित कवींचे काव्यसंमेलन , पुन्हा        एकदा पुस्तक स्टॉलला भेटी हे कार्यक्रम आटपुन् घेतले  ....!  खरंतर संध्याकाळचे सर्वात सुंदर आणि आवडते कार्यक्रम होते   …! "पंडित भीमसेन जोशी " यांचे "अभंगवाणी"  आणि हृदयनाथ मंगेशकर यांचे "अमृताचा घनु "  या कार्यक्रमातील या दिग्गजांच्या स्वर्गीय आवाजातील गायनाचा आनंद याला मात्र मी मुकणार होते  …!!

     पण  तरीही मी दोन दिवसात जो आनंद उपभोगला तेहि नसे थोड़के  …!

                                      " स्वर्गसुखाचे भोगासी
                                       तीर्थाची तुलना काय होई
                                       तीर्थ म्हणजे आनंदभु ठायी ठायी"   ....!!!

असेच काहीसे भाव घेऊन मी एकटीच परतले  …!! तरीही आळंदी  साहित्य संमेलनातील माझा एकूण अनुभव काय  …? तर अनेक लहान मोठ्या , असामान्य - सामान्य - अतिसामान्यांच्या सहवासातील एक अलिप्त - एकांगी सहवास  …!! ज्या अपेक्षित क्षणांच्या आशेने गेले होते  "त्या" क्षणांपेक्षा अधिकतर अनपेक्षित क्षणांची ओंजळ भरून  आणली   …!  परिसंवादात - वाद-विवाद दिसले, सुसंवादात फक्त एकांगी संवाद दिसला , सहभागापेक्षा उपभोग दिसला , आनंद-खुशीपेक्षा हौशी दिसल्या  … या साहित्य सोहळ्यात अश्या या ब-याच मोकळ्या जागा दिसल्या   …!

    मी स्वत: मात्र काव्यसंमेलनातील सुन्दर - सुबोध कवितांचा आनंद घेतला   .  परंतू निमंत्रितांच्या कवितांपेक्षा नवोदितांच्या कविता मला अधिक भावल्या   ! परंतु त्यातही सुकाळाच्या नवोदित कवींच्या भाऊगर्दीत बरे झाले  आपण नाही असे वाटल्याशिवाय राहिले नाही ! .  पण साहित्यसंमेलनाचा  एकूणच अनुभव मनाला समाधान देणारा नसला तरी एका नवीन अनुभवाची माझ्या जीवनात भर पडली आहे याचेच मला खुपच समाधान वाटले   ....!!

     "मित्र-मैत्रिणींनो त्याहून विलक्षण चमत्कार म्हणजे ज्या मुलाखतीसाठी मी माझा साहित्यिक आनंद अर्धवट सोडून परतले होते    .... त्या मुलाखतीत मला जवळ जवळ सर्वच प्रश्न आळंदी येथे भरलेल्या साहित्य संमेलनावरच  विचारले गेले   .... हां विलक्षण योगायोग होता  की माऊलीची कृपा  .... माहीत नाही पण मला govt नोकरी मिळाली  …!!!!!


                                                                                        " समिधा"


   
                                   




लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......