पोस्ट्स

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

प्रतिमा
किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिकाव्याने हल्ला करावा आणि जीत्या जागत्याला आपल्यापासून दूर दूर न्यावे   …!  जिथे त्याला आपली हाक ऐकू येत नाही   … आपला आक्रोश  … आपले आक्रंदन  दिसत नाही   ! या सा-याच्या पलीकडे तो निघून जातो   …!  मागे उरतात आपले कोंडलेले श्वास आणि अधीर मन आणि मनाचा न दिसणारा कोंडमारा  !  गेलेल्याचे दुःख असते  की त्या सोबत उरलेल्या आनंदाच्या  ठेव्याचे आता काय करायचे याचा शोक असतो  …!!  असा "तो" आपला मित्र असतो आप्त असतो  आणि कधी कधी कुणीच नसतो   … पण काही क्षण जरी आपण "त्या" व्यक्ति सोबत घालवले असतील तरी पुढच्याच काही काळात तो आपल्यातून गेला तरी हृदयात खोल खोल खड्डा पडतो ....! अदॄश्य दुःखाची कळ छातीत येतेच  येते ....!!


           अगदी अलीकडेच आमच्या कॉलनीत  एक ड्रेस मटेरियल चे दुकान उघडलेले होते ! गेला आठवडा मी
ते पाहत होते ! दुकानाबाहेर लावलेले ड्रेसेस रोज पाहत होते,  आणि एकदिवस शेवटी त्या दुकानात प्रवेश केलाच   ....  तिथे एक २४/२५ वर्षाची लग्न झालेली …

" माझे काव्यवाचन........" 😉😜

प्रतिमा
एका काव्यवाचनाचं आमंत्रण आलं....! खुप खुष होते ! अगदी घरात ह्यांच्या पासून आत्ताच कविता करू लागलेल्या लहान लेकीलाही कितीतरी वेळा विचारून झाले "कोणती कविता वाचून दाखवू ...? "
ह्यांच म्हणनं "बघ , तुला आवडेल ती वाच...!"
आणि लेकीचं आपलं भलतंच "आई जी तुला पाठ आहे ती तू वाच ! (हं मी तिला तिची पुस्तकातली कविता पाठ करायला सांगते नं त्याचं उट्ट काढायला म्हणत असेल कदाचीत 😊😊).
माझ्या मते कविता पाठ असण्याशी आणि वाचन करण्याशी काय तरी संबंध असतो का आजकाल ?..😃
काव्यवाचनाला आजकाल कवि लोक डायरी (हल्ली कवितांची डायरी नेणं अगदीच बैकवर्ड लक्षण हं )नाहीतर अन्ड्राइड मोबाईल नेतात !
एका झटक्यात सॉफ्ट टच करून हवं ते स्क्रीनवर पहाता येतं ! इतकं सारे सोप्पे मार्ग असतांना कविता पाठ कशाला हवी?
काव्यवाचनाचा दिवस ....कल्याण सार्वजनिक वाचनालयचं सभागृह
प्रेक्षकांनी तुडूंब भरलाय....! मनात धाकधूक होती , तरी काव्यवाचनाचा उत्साह कमी झालेला नव्हता...! तेवढ्यात आयोजकांनी सर्व कवि लोकांना काव्यवाचन करण्यास स्टेजवर बसण्यासाठी बोलवलं ! आम्ही सगळे आपआपला जामानिमा सांभाळ…

नको देवराया अंत असा पाहू .... !!!

प्रतिमा
आज ऑफिस मध्ये निवृत्त झालेल्या एक सफाईकामगार रुक्मिणी मावशी आल्या होत्या, माझ्या टेबल जवळ येऊन उभ्या राहिल्या , मी कामात होते त्यामुळे माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हते , पण मला जाणवले कुणीतरी माझ्या टेबल जवळ उभे आहे, मी मान वर केली तर रुक्मिणी मावशी ... ! मी हसून विचारले काय मावशी कश्या आहात ? झाले ना सर्व पेन्शनची , ग्रॅज्युइटीची कामं .... हो गं लेकी  तुज्यामुळं सगळं यवस्थित मिळालं पैसं ... ! मलाही ऐकून बरे वाटले , आता या वयात त्यांना जास्त फे-या माराव्या लागू नयेत म्हणून खूप कमी दिवसात कागदोपत्री सा-या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्यांची पेंशन चालू केली होती . ऑफीसचा लंच टाइम झालाच होता , मावशी जेवणार नां आमच्या सोबत , चला जुन्या आठवणी जरा ताज्या करू ... मावशींना माझ्या सोबत घेऊन मैत्रिणींच्या टेबलाकडे निघाली तर मावशी थबकल्या , म्हणाल्या नको मॅडम , तुमी जावा , तुमी येवतर  मी हतच बसते ...! मला वाटले मावशी उगीचच  इकडे आलेल्या नाहीत . 
     रुक्मिणी मावशी रिटायर्ड होऊन दोन वर्षांनी आज ऑफिसला आल्या होत्या .... का बरं आल्या असतील...?  मी लंच आटपून आले तोवर मावशी माझ्या टेबलपाशी बसल्या हो…

प्रिय ......... काल रात्रभर जागीच होते....

प्रतिमा
प्रिय .........
काल रात्रभर जागीच होते....
तुला भेटून आल्यापासून काहीच
सुचत नव्हते....
आईनेही विचारले पण काहीच सांगता आले नाही....
किती कोवळी हळवी पहिली भेट पण ....मनावर मोरपीस फिरवत संपली....!!
देवळाच्या चौथ-यावर हातानं
रांगोळी काढत काढत किती अनं
काय बोलले ,ऐकलं काही आठवतंच नाही....!
तुझ्या विशाल अथांग डोळ्यात पहातांना मी त्यांत कधी हरवले
कळलंच नाही....!
ह्रदयाची धडधड आणि अंगाची
थरथर त्यामुळे मुखातून शब्दही
फुटत नव्हते...!!
आणि जेव्हा तू हातात हात घेतलास .....शरिरात अशी
वीज थरारली की अंगअंग तापून गेले
म्हणूनच कदाचीत कालपासून ताप भरलाय....!!
कुठेसे वाचले होते यालाच प्रेमज्वर म्हणतात म्हणे 😚
तुझ्या प्रेमाला होकार द्यावा की नाही तोच विचार करते आहे...!

प्रेम सोपे नसते .....हेच ऐकत आले आहे....पण मन मात्र नाही नाही म्हणता तुझ्याकडेच धाव घेतेय...!!
पण मला भिती वाटते...हा प्रेमसागर मी पार करू शकेन...?
प्रेमाचे नाते जुळायला प्रथम मनं एकत्र यावी लागतात .....मनाकडून मनाकडे जाणारी ओढ हीच खरी नात्याची गरज आहे......!!
शरीर हे माध्यम असते पण तेच जर नाते टिकवण्यासाठी साधन
म्हणून वापर…

" दि डायरी ऑफ अँन फ्रँक "

प्रतिमा
दि डायरी ऑफ अँन फ्रँक" हे पुस्तक हातात आले आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेवरूनच हे पुस्तक अतिशय सुंदर वाचनीय ठरणार याबाबत खात्रीचे पटली!हे पुस्तक जसजसे वाचत जावे तसतसे ते आपल्या भाव भावनांचा ताबा घ्यायला सुरूवात करते!! कित्येक ठिकाणी तर आपल्याच जीवनातील परिचीत रंग अनुभवाला येतात!१९४२ मध्ये दुस-या महायुद्धात जर्मनानी ज्यु लोकांचा जो अनन्वीत छळ मांडला होता त्या छळाला टाळण्यासाठी अँन व तिचे आई वडील व बहीण मार्गारेट एका डच कुटूंबाच्या मदतीने अज्ञातवासात रहात होते . या अज्ञातवासात त्यांच्याबरोबर श्री व सौ व्हेडँन व त्यांचा मुलगा पिटर हे कुटूंब व डसेल हा दंतवैद्य होता . 
      १९४२ जुलै ते १ऑगस्ट १९४४ पर्यतचा त्यांचा अज्ञातवासातील जीवनपट अँन ने ह्या तिच्या डायरीतून दिसतो. केवळ १४-१५ वर्षाची अँन पण ह्या तीन वर्षांत अँनच्या मनस्थीतीत होणारी स्थित्यंतरे वाचतांना जीवनाबद्दलची आसक्ती माणसाला जगायला शिकवते याचा प्रत्यय येत रहातो . प्रत्येक क्षणाला जर्मन गेस्टोपांच्या धाडीची टांगती तलवार घेऊन या माणसांचे जगणे म्हणजे मृत्यू जवळ होता पण तो दिसत नव्हता ... पण त्याची जाणीव सतत ह…

"नामाचा महिमा....!"

प्रतिमा
मी आई होणार हे जेव्हापासून कळलं तेव्हापासूनच
होणारं बाळ मुलगा असेल तर .... हे नाव ठेवायचं आणि मुलगी असेल तर .... हेच नांव ठेवायचं पक्क केलं पण
पण जेव्हा नेमकी वेळ आली आणि बाळाचं माझ्या लेकीचं काय नांव ठेवावं हा मोठा गहन प्रश्न झाला, मी सुचवलेली नावं एकदमच आउटडेटेड आहेत असं सर्वॉचं म्हणनं पडलं... मग काय आत्या, काकी, मावश्या , ताई माई आई सा-यांची शोध मोहीम आणि
एक एक नांव सुचवणं सुरू झालं....शेवटी बाळाचं नांव ठेवायचा अलिखीत अधिकार आत्याचा असतो आणि माझ्या बाळाच्या आत्यानं तो अगदी आनंदाने बजावला! नांव ठेवलं शर्वरी .....! आणि योगायोगाने ते
आमच्या नवदुर्गा देवीचंही नांव असल्याचे कळल्याने शर्वरी नाव ठेवल्याचं सार्थक झाल्यासाखे वाटले... बाळ आता ब-यापैकी मोठं झालं... नावांत काय आहे... ? या शेक्सपियरला पडलेल्या प्रश्नाची उकल मला हळू हळू होऊ लागली ....एक दिवस लेक म्हणते आई माझं नांव छानच आहे , पण अजून एखादं जरा मॉडर्न नांव का गं नाही ठेवलं....? आलिया, प्रिटी वगैरे ... !
" का तुझं नाव आवडत नाही का?" मी
आवडतं पण वर्गातल्या ब-याच मुलींची नावं शिना , रिया, किया अशी एकदम हटके…

" घर खरंच निर्जीव असते का ..?"

प्रतिमा
(माझे सासरचे  गोव्याचे घर)      आपली मनं  जिवंत सजीव असतील तर निर्जीवतेतही चैतन्य येते  …!! निर्जीव वस्तुत आपल्या भावना गुंतने म्हणजे काय याचा प्रत्येकाने अनुभव घेतला असेलच !

     मध्ये एका स्रीचा  अनुभव वाचनात आला होता. जुने घर विकून ती नवीन घरात रहायला जाण्याचा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय पक्का झाला होता !  त्याच आनंदात ती नवीन घर कसे सजवायचे त्याला रंग कोणता द्यायचा फर्नीचर कसे  घ्यायचे ?  अनेक गोष्टींचा विचार सतत तिच्या मनात असायचा !  कुठे बाजारात गेली तरी नविन घरी आपण हे घ्यायचे का ते घ्यायचे का स्वतशीच तिची सल्ले घेणे देणे चालू असायचे , कुणा मैत्रीणीकडे गेली तरी तिच्या न घेतलेल्या नवीन घराबद्दलच बोलत रहायची। ..!  जुन्या राहत्या घराला ती  जणू विसरुनच गेली होती   ....!

     एक दिवस तिची एक मैत्रीण खुप दिवसांनी तिच्या  घरी आली  .   तिने घरात प्रवेश करताच म्हणाली "काय ग काय हा अवतार केला आहेस  ...?"  हिने लगेच आपल्या केसांवरुन हात फिरवत साडी वगैरे नीट केली  .  तर मैत्रीण हसून म्हणाली " अगं  तुझा नाह…